गोड शिऱ्यानंतर आता गोडाचा शिरा बनवा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 June 2019

गोडाचा शिरा

साहित्य - भाजलेला बारीक रवा १ वाटी, साजूक तूप- २ टे.स्पून, साखर-१ ते सव्वा वाटी(किंवा चवीप्रमाणे), गूळ-सुपारीएवढा खडा, वेलची पूड-अर्धा ते एक टीस्पून, केशर-४,५ काड्या, पिस्ते,बदाम्,काजू, बेदाणे (चवीप्रमाणे), पाणी -२ वाट्या, दूध- अर्धी वाटी. (रवा, पाणी,दूध,साखर ह्यांची मापाची वाटी एकच असावी)

कृती:
रवा बारीक गॅसवर थोडं तूप घालून खमंग भाजून घ्यावा.(अगदी लालसर करायची गरज नाही). भाजून झाल्यावर बाजूला ठेवून नॉनस्टीक पॅनमध्ये २ वाट्या पाणी उकळत ठेवावं. उकळी आल्यावर त्यात साखर, गूळ, वेलची पावडर घालावी. अर्धी वाटी दूध गरम करुन त्यात केशर घालावं म्हणजे छान रंग येईल. पाण्यात घातलेली साखर विरघळली की त्यात दूध घालावं. नीट ढवळून काजू,बदाम, पिस्ते, बेदाणे घालावेत. उकळी आली की त्यात भाजलेला रवा पेरत पेरत घालावा. एका हाताने ढवळत राहावं म्हणजे गुठळी होणार नाही. मिडियम गॅसवर झाकण घालून वाफ काढावी व पाणी आटल्यावर गॅस बंद करावा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News