बुधगावला वसतिगृह बंदची नोटीस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • शिक्षण उपसंचालकांचा निर्णय; ग्रामीण मुलांच्या सोयीवर हातोडा

बुधगाव - येथील शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह मे २०२० पासून बंद करण्याची नोटीस शिक्षण उपसंचालकांकडून मिळाली आहे. या वसतिगृहासाठी तेथे दहा एकर जागा होती. जुन्या दगडी मजबूत इमारती होत्या. आता मात्र ग्रामीण भागातील गरीब मुलांना शिक्षण घेताना निवासाची हक्काची सोय असलेल्या या वसतिगृहाचे अस्तित्वच राहणार नाही. स्थानिक शिक्षण संस्थेने जागा घेऊन टोलेजंग इमारती बांधून आपल्या शिक्षण संस्थांचा विस्तार सुरू केला आहे. दुष्काळी भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणसुविधेवर हातोडा पडत असल्याची भावना आहे. 

बुधगावच्या वसतीगृहाची सुरवात सन १९७० मध्ये सुरू झाले. १०० मुलांसाठी निवास, भोजनाची क्षमता होती. या वसतिगृहामुळे किमान २५ हजारावर मुलांच्या शैक्षणिक जीवनाला आधार मिळाला. अडचणींचा अंधार दूर झाला. आज तेच वसतिगृह बंद केले जाण्याची वेळ आहे. मात्र त्याकडे कोणाचे लक्ष आहे, ना कोणी त्याबाबतीत दक्ष आहे. 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या वसतिगृहावर हातोडा पडणे भूषणावह नाही. सांगली, माधवनगर, बुधगाव, कवलापूर परिसरातील शिक्षण संस्थांत शिकणाऱ्यांसाठी हे वसतीगृह आधार ठरले होते. तो आधार नष्ट झाल्यास सध्या ते राहणाऱ्या पन्नासवर अधिक विद्यार्थ्यांचा खर्च  वाढणार आहे. कदाचित काही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जातील हा धोका आहे. 

बुधगाव वसतिगृहाबाबत सहा वर्षे पाठपुरावा सुरू आहे. शिक्षण उपसंचालकांचीच भूमिका संदिग्ध असून, जागा लाटण्याचा प्रयत्न आहे. पन्नास वर्षे सुरू असलेले वसतिगृह बंद पडेल. गरीब असलो तरी हक्काचे शिक्षण घेता येण्याचा मार्ग बंद होणार आहे.
-बजरंग पाटील, शिवसेना संघटक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News