नॉट विदाऊट माय डॉटर

सौ स्वाती श्रीकांत धर्मापुरीकर
Thursday, 1 August 2019
  • दोघींचेही पासपोर्ट स्वतः जवळ ठेऊन घेतो ,15 दिवस शोभेची बाहुली बनून बेट्टी ला सर्व नातेवाईकांना भेटवतोआणि 15 दिवसानंतर बेट्टी आणि माहतोब ला नजरकैदेत ठेऊन कधीही अमेरिकेत न जाण्याचं जाहीर करतो.

2 दिवस झालेत पुस्तक वाचून पूर्ण केलंय, पण अजूनही तिथेच घुटमळत उभिये..... "नॉट विदाऊट माय डॉटर"...बेट्टी मेहमूदी ची स्वतः ची जगलेली गोष्ट...सहन केलेल्या यातनांचा प्रवास,भोगलेल्या दुःखांचा डोंगर पण त्याचबरोबर तिच्या जिद्दीची अवर्णनीय सहासकथा, स्वतःच्या मुलींवरच्या निस्सीम प्रेमाची गाथा...

पुस्तकात सुरुवातीला च सांगण्यात आलंय की लेखिका सध्या तिच्या मुलीसोबत आणि 2 मुलांसोबत मिशिगन, अमेरिकेत राहतं आहे, तरीही पुस्तक शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवतं.

अमेरिकन बेट्टी च इराणी डॉक्टर असलेल्या सय्यद बोझोर्ग मेहमुदी(मुडी) शी लग्न होतं आणि एक छानशी मुलगी होते 'माहतोब'...7 वर्ष अमेरिकेत सुखाने संसार सुरू असताना इराण मधील हुकूमशाही चा अस्त होतो आणि सरकार स्थापन होतं तेंव्हा मुडी बेट्टी आणि माहतोबला स्वतः च्या कुटुंबियांना भेटायला इराण ला घेऊन जातो,फक्त 15 दिवसांसाठी... पण त्याच्या मनात खूप मोठं षडयंत्र रचून तयार असतं.

तो दोघींचेही पासपोर्ट स्वतः जवळ ठेऊन घेतो ,15 दिवस शोभेची बाहुली बनून बेट्टी ला सर्व नातेवाईकांना भेटवतोआणि 15 दिवसानंतर बेट्टी आणि माहतोब ला नजरकैदेत ठेऊन कधीही अमेरिकेत न जाण्याचं जाहीर करतो.

स्वतंत्र विचारांची आणि वृत्ती ची बेट्टी त्या पारंपरिक आणि कट्टर धार्मिक वातावरणात घुसमटते,शारीरिक छळ सहन करते,मुलीची आणि स्वतः ची ताटातूट सहन करते आणि एकीकडे सतत सुटकेसाठी ह्या न त्या मार्गाने प्रयत्न करत राहते.

अमेरिकन ऐम्बसी ची महिला अधिकारी हेलन खूप मदत करते पण घटस्फोट घेऊन मुलीसह अमेरिकेत बेट्टी जाऊ शकत नाही अशी इराणी कायद्याच्या चौकट पण तिला सांगते आणि ह्या गोष्टी साठी बेट्टी कधीही तयार होतं नाही.अश्यावेळी परक्या देशात सुद्धा माणुसकी चा प्रत्यय येतो बेट्टीला.

टेलिफोन वाला हमीद मदतीचा हात पुढे करतो,आणि ती ला सुटकेची नवी दिशा सापडते पण शेवटी एक एक करून सर्व मार्ग बंद व्हायला लागतात.बरेचदा बेट्टी हताश,निराश होते पण त्या अमेरिका द्वेषी देशात तिच्या स्वाभिमानवर च गदा येते प्रत्येक वेळी... आणि जेंव्हा माहतोबला सोडून अमेरिकेत जायची वेळ मुडी तिच्यावर आणतो तेंव्हा मोठं धाडस करून ती घरातुम पळ काढते आणि अमालच्या मदतीने सगळ्यात बेभरवशाच्या आणि अवघड मार्ग म्हणून सांगितल्या गेलेल्या तुर्कस्तान मार्गे प्रवास करून बेकायदेशीर रित्या माहतोब सह पळून जाण्यात यशस्वी होते.डोंगर दऱ्यातून पायी,अनोळखी लोकांसोबत, टोळीवाल्यांसोबत...

जिथं कोणावर विश्वास टाकावा हा प्रश्न असतो तिथे ती परमेश्वरावर अगाध श्रद्धा ठेवून तुर्कस्तान मध्ये पोचण्यात यशस्वी होते, आणि तिथून तिच्या आई च्या मदतीने अमेरिकेत मोकळा श्वास घेते...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News