निवडणुक लढवण्यासंदर्भात अद्याप कुठलाही विचार नाही - विनोद पाटील

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 25 July 2019

जो पक्ष सामाजीक विषय आणि युवकांचे विषय मांडण्यासाठी व्यासपिठ देईल त्या पक्षात मी नक्कीच जाईल. आणि यावर माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मी योग्य तो निर्णय घेईल.

मुंबई - मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील लवकरच राजकीय मैदानात उतरणार अशी जोरदार चर्चा रंगताना पाहयला मिळतेय. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून काही नावं चर्चेत आहेत.यामध्ये विनोद पाटील यांचंही नाव चर्चेत असल्याचं वृत्त एका वाहिनीने दिले होते. मात्र यावर निवडणुक लढवण्यासंदर्भात अद्याप कुठलाही विचार केला नसल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. त्याच बरोबर मला कुठल्याही पक्षाकडून अधिकृत ऑफर आलेली नाही.

जो पक्ष सामाजीक विषय आणि युवकांचे विषय मांडण्यासाठी व्यासपिठ देईल त्या पक्षात मी नक्कीच जाईल. आणि यावर माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मी योग्य तो निर्णय घेईल. मात्र सध्या तरी निवडणुक लढवण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही, असं देखील विनोद पाटील म्हणाले. 

कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निकाल आल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यातील विविध पक्षातील नेत्यांची भेट घेत आभार मानले होते. यावेळी विनोद पाटलांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विनोद पाटलांसह सर्वांचं अभिनंदन केलं होतं.

मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई यामुळे विनोद पाटील हे नाव चर्चेत आलं. सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर विनोद पाटील यांनी न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी पाठपुरावा केला.दरम्यान, मराठा आऱक्षणाबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने तुर्तास नकार दिला आहे. दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका करु शकतात, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News