आता भिण्याची गरज नाही ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे एवढे आमदार संपर्कात’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार संपर्कात’
  • राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी​

मुंबई - राज्यातील अख्खा काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादीचे १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला. राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी असल्याचे विधानही त्यांनी या वेळी केले.

राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मोठी संधी असून, भाजपसोबत शिवसेनेने युती केल्यामुळे मराठी अस्मितेची निर्माण झालेली पोकळी राज ठाकरेंना किंगमेकर बनवू शकेल, असे विधानही त्यांनी या वेळी केले. मात्र राज ठाकरेंच्या ‘मनसे’ सोबतची संभाव्य आघाडीची शक्‍यताही त्यांनी फेटाळून लावली. 

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबतही त्यांनी या वेळी मते मांडली. राज्यात औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लीम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत वंचित आघाडीचा पराभव झाल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News