'ब्रिफकेस'ची परंपरा निर्मला सीतारामन यांनी काढली मोडीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा आहे. मात्र, आज सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढली. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा (एनडीए-2) अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची परंपरा आहे. मात्र, आज सीतारामन यांनी ही परंपरा मोडीत काढली. 

सीतारामन लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प घेऊन अर्थ मंत्रालयात आल्या. यावेळी त्यांच्याकडे 'ब्रिफकेस' नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अर्थसंकल्प ब्रिफकेसमधून संसदेत आणण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा ही प्रथा मोडीत काढण्यात आली.

त्यामागील कारण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी सांगितले, की अर्थसंकल्पाला आपण चोपड्या म्हणतो. चोपड्या लाल रंगाच्या कपड्यात असतात. ती आपली परंपरा आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News