नववीच्या मुलांनी बनवला स्मार्टट्रक 

गणेश पांडे
Tuesday, 13 August 2019

परभणी - दररोज नवे क्रिऐशन करण्याची धडपड, जगातील नव- नवीन आविष्कारांचा अभ्यास व तज्ञ शास्त्रज्ञाचा सततचा सहवास याच्या जोरावर परभणीतील एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थाने स्मार्ट ट्रक बनविला आहे. या ट्रकमधील वेगळेपणा हा त्याच्यात असलेल्या फिचरमुळे दिसतो. 

शेख समीर शेख मुसा असे या मुलाचे नाव असून त्याने तयार केलेल्या स्मार्ट ट्रकची सध्या परभणी जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

परभणी - दररोज नवे क्रिऐशन करण्याची धडपड, जगातील नव- नवीन आविष्कारांचा अभ्यास व तज्ञ शास्त्रज्ञाचा सततचा सहवास याच्या जोरावर परभणीतील एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थाने स्मार्ट ट्रक बनविला आहे. या ट्रकमधील वेगळेपणा हा त्याच्यात असलेल्या फिचरमुळे दिसतो. 

शेख समीर शेख मुसा असे या मुलाचे नाव असून त्याने तयार केलेल्या स्मार्ट ट्रकची सध्या परभणी जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

परभणी शहरातील दर्गारोड परिसरातील आजम कॉलनीतील रहिवाशी असलेले शेख मुसा यांचा मुलगा शेख समीर हा शहरातील क्विन्स इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता नववीला शिक्षण घेतो. लहानपणापासूनच समीरला वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचा छंद होता. त्याचे या सर्व गोष्टी तयार करण्यात मन रमत असे. त्याच्या अंगातील कौशल्य ओळखून त्यांच्या आई-वडीलांनी त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. या प्रोत्साहानातून समीरने स्मार्ट ट्रक बनविला आहे. 

हा ट्रक इतर ट्रक सारखा जरी दिसत असला तरी त्याच्यातील वेगळेपणा या ट्रकला स्मार्ट बनवतो. समीर शेखला या ट्रकबद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्याने मागील दोन वर्षापासून यावर काम करण्यास सुरवात केली होती. यात इंटरनेटच्या सहाय्याने त्याने माहिती गोळा करून या ट्रकची निर्मीती केली आहे. 

काय वेगळे आहे ट्रकमध्ये...
1 . अल्कोहल सेन्सर समीर शेखने तयार केलेल्या ट्रकमध्ये तीन वेगवेगळे सेन्सर बसविण्यात आलेले आहेत. जर ट्रक ड्रायव्हर अल्कोहल पिऊन ट्रक चालवत असेल तर हा ट्रक तातडीने ट्रकची स्पिड कमी करून काही सेकंदाच हा ट्रक बंद पडेल. 

2. रस्त्यावरील अडथळे ओळखणे ट्रक रस्त्याने भरधाव वेगाने जात असेल आणि समोर काही अंतरावर मोठा अडथळा किंवा मनुष्य असेल तर हा ट्रक स्वता तातडीने स्पिड कमी करून ज्या दिशेला मोकळी जागा असेल त्या दिशेला आपोआपच वळला जातो. 

3. एलडीआर या ट्रकमध्ये एलडीआर नावाची यंत्रणा काम करते. त्यामुळे रात्र झाली किंवा अंधार पडला की या ट्रकचे फॉगलॅप कार्यान्वीत होतात. आणि उजेड पडला की दिवे बंद होतात. 

4. गॅस सुरक्षा सायरन या ट्रकमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर असेल किंवा सिलेंडर वाहतुकीचा ट्रक असेल तर गॅस लिकीज झाल्यास तातडीने या ट्रकमधील सायरन वाजण्यास सुरुवात होते.

या ट्रकमध्ये एक मायक्रो कंट्रोलर काम करते. हे मायक्रो कंट्रोलर या सेंन्सर पर्यत त्या - त्या संदर्भाची माहिती पोहचविते. त्यामुळेच हे सेंन्सर काम करता. या मायक्रो कंट्रोलर मीच बनविला आहे. 
- शेख समीर शेख मुसा, विद्यार्थी 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News