या चित्रपटासाठी नीना-गजराज पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शुभ मंगल सावधान’ या आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकरच्या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली.

मुंबई : २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शुभ मंगल सावधान’ या आयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकरच्या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘शुभमंगल जादा सावधान’ या नावाने येत आहे. त्यात नीना गुप्ता आणि गजराज राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

 ‘बधाई हो’ या चित्रपटामध्ये नीना-गजराज यांनी धमाल आणली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा कॉमेडी अंदाज रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. ते कोणत्या भूमिकेत दिसणार, हे गुलदस्त्यात आहे. ‘शुभमंगल जादा सावधान’ची कथा एका समलैंगिक युवकाची आहे. आयुष्मानही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाखल होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News