नीलेश राणें म्हणतात, "संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार"

सकाळ (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • नीलेश राणे यांची ट्विट करुन शिवसेनेवर टीका
  • आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा

मुंबई :युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बुधवारी  महत्त्वपूर्ण विधान केले होते. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. पण राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल, असे विधान त्यांनी केले होते.

मात्र, आता या विधानाच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली. “संजय राऊत यांच्यासारखी लोकं ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये”, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, नीलेश राणे यांनी नाणार प्रकल्पावरुनही शिवसेना- भाजपा युतीवर टीका केली. युती करण्यासाठी ज्या घाईने प्रकल्प रद्द केला तो फक्त देखावा होता. कोकणातल्या जनतेला कधी कळणार?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News