मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पुढच्या टप्प्याला २१ ऑगस्टचा मुहूर्त !

सकाळ (यिनबझ)
Friday, 16 August 2019

राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेला २१ ऑगस्टपासून नंदुरबारहून सुरवात करण्‍यात येणार आहे.

नंदुरबार : राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेला २१ ऑगस्टपासून नंदुरबारहून सुरवात करण्‍यात येणार आहे.

यात्रेचा हा दुसरा टप्पा असेल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. या यात्रेअंतगर्त मुख्यमंत्री नंदुरबार येथे सकाळी अकराला जाहीर सभेद्वारे नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी दीडला ते शहादा येथे संवाद साधतील. शहाद्याहून यात्रा सारंगखेडा मार्गे दोंडाईचा येथे येईल. तेथे जाहीर सभेनंतर यात्रा शिंदखेडामार्गे धुळ्याला जाईल. 

दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्टला सकाळी दहाला धुळ्यात पत्रकार परिषद होईल. तेथून यात्रा अमळनेरला स्वागत (सकाळी साडेअकरा), धरणगाव (साडेबारा) मार्गे जळगावला दुपारी दीडला पोचेल, तेथे जाहीर सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील.

त्यानंतर तीनला जामनेर येथे सभा होईल. सायंकाळी पाचला भुसावळ येथे सभा होईल. भुसावळला मुक्काम असेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News