ठरलं! पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच; भाजपच्या गोटात चलबिचल?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने शिवसेनेनं आपलं मुखपत्र 'सामना'तून आपली भूमिका अतिशय प्रखरपणे स्पष्ट केली आहे.

मुंबई : आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने शिवसेनेनं आपलं मुखपत्र 'सामना'तून आपली भूमिका अतिशय प्रखरपणे स्पष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री असायला हवा असे आदेश दिला होता. त्याला उत्तर देण्यासाठी सामना'तील अग्रलेखात शिवसैनिकांना आदेश देण्यात आला आहे की, 'पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा.' शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

वर्धापन दिनाचं औचित्य साधून शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना आगामी काळात कशा पद्धतीने राजकारण करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेनेनं अशाप्रकारे थेट भूमिका मांडल्याने भाजपच्या गोट्यात नक्कीच चलबिचल होण्याची शक्यता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News