नवनीत राणा जिंकूण आल्या, त्या शिवसैनिकांमुळेच, अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 14 July 2019

लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अमरावतीत शिवसेनेतली अंतर्गत वाद उफाळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उद्या रविवारी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसैनीकांची बैठक बोलावली आहे.

शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंतराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गद्दारींमुळेच झाल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

नवनीत रवी राणा यांचा विजय आणि आभार रॅली मधील माजी खासदार अनंतराव गुढे यांचा पत्नीने खासदार नवनीत रवी राणा यांचा सत्कार करून दिलेल्या शुभेच्छा. याचे व्हिडिओ, तसंच फोटोग्राफ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या रविवारी मातोश्रीवर बेठक बोलावली आहे.या बेठकीला अनंतराव गुढे यांना तातडीनं बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News