'हे' व्हॉट्स अॅप फिचर तुमच्याकडे आहे का? तुमचं स्टेटस फेसबुकवरही शेअर करता येणार

आरती औटी (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • व्हॅाट्स अॅप चा नवीन अपडेट
  • व्हॉट्स अॅप स्टेटस फेसबुकवरही

 

व्हॉट्स अॅप खुप कमी कालावधीत लोकप्रिय झाले. अनेकांचे व्हॉट्स अॅप शिवाय पानही हालत नाही. प्रसिद्ध आणि जगजाहीर असे हे व्हॉट्स अॅप आपल्यासाठी नविन अपडेट घेऊन आले आहे. 

लोकांमध्ये व्हॉट्स अॅप स्टेटस फिचरची खूप चर्चा होत असते. आता व्हॉट्स अॅप स्टेटससोबत आणखी एक अन्य फिचर जोडलं जातं आहे. ज्याच्या मदतीनं तुम्ही व्हॉट्स अॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अॅपवरही शेअर करू शकणार आहात. व्हॉट्सअॅपचे हे फिचर सध्या व्हॉट्स अॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. व्हॉट्स अॅप स्टेटस फेसबुकवर शेअर करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी फेसबुक किंवा फेसबुक लाइट अॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करणं गरजेचं आहे. विविध अपडेटसाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील.

जुने व्हॉट्स अॅप स्टेटसला फेसबुक स्टोरीवर शेअर करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा...
1. सर्वांत पहिलं तुम्हांला तुमच्या फोनवर व्हॉट्स अॅप ओपन करावं लागेल. 
2. स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा. 
3. आपलं स्टेटस अपडेट करा. 
4. तुम्हाला स्टेट नविन किंवा जुन्याच्या आधारावर दोन शेअरिंग पर्याय मिळेल. 
5. नवीन व्हॉट्स अॅप स्टेटस फेसबुक स्टोरीवर शेअर करण्याचे ऑपशन मिळेल.
6. नवीन स्टेटस शेअर करण्यासाठी तुम्हाला माय स्टेटसवर जावं लागेल आणि शेअर फेसबुक स्टोरी पर्यायावर क्लिक करा. 
7. जेव्हा पॉप अप येईल तेव्हा तुम्हाला अलाऊ किंवा ओपन यावर टॅप करावं लागेल. जो तुम्हाला फेसबुकवर घेऊन जाईल. 
8. फेसबुकवर तुम्ही लोकांची संख्या निवडून शेअरच्या पर्यायावर टॅप करा. 

मात्र लक्षात ठेवा की, जर का तुम्ही आणखी कोणता टॅब सुरू केल्यास फेसबुक स्टोरीचा पर्याय गायब होणार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News