टीम इंडियाच्या जर्सीवर आता OPPO ऐवजी BYJU'S

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर ओप्पो या चिनी मोबाईल कंपनीचं नाव होत. पण आता लवकरच चेन्ज होणार असल्याची माहिती आहे

लवकरच एक नवीन ब्रॅड भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर दिसणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर ओप्पो या चिनी मोबाईल कंपनीचं नाव होत. पण आता लवकरच चेन्ज होणार असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये ओप्पो कंपनीने पाच वर्षासाठी १,०७९ कोटी रुपयांना यासंबधीचे हक्क विकत घेतलेले. 

मात्र यावर्षीपासून टीम इंडियाच्या जर्सीवर आता बायजू या कंपनीचं आव दिसणार आहे. ओप्पो कंपनीने निर्णय घेतलाय की यासंबंधितले सर्व अधिकार त्यांनी  बायजू या कंपनीला दिले आहेत. लवकरच भारतीय क्रिकेट टीम नवीन जर्सी घालून मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे.दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध १५ सप्टेंबर पासून या मॅच सुरवात होईल. 

ओप्पो आणि बायजू या दोन कंपनी मध्ये झालेला हा करार खूप खर्चिक असल्यानं कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. या दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार गुरुवारी होईल अशी माहिती आहे. जेवढे पैसे ओप्पो कंपनी कडून मिळत होते तेवढेच पैसे बीसीसीआय मिळणार आहे. या करारामध्ये कोणताही नुकसान होणार नाहीय हा करार फक्त २०२२ पर्यंत असणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News