प्रमोशनसाठी नवा खटाटोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019

आपला चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावा यासाठी निर्माते-दिग्दर्शक नवनवीन प्रमोशनल फंडे शोधून काढतात. आता असाच काहीसा प्रकार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाबाबत घडला आहे.

आपला चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावा यासाठी निर्माते-दिग्दर्शक नवनवीन प्रमोशनल फंडे शोधून काढतात. आता असाच काहीसा प्रकार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाबाबत घडला आहे.

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डान्सिंग स्टार पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करताना दिसणार आहे. शिवाय बॉलिवूडमधील हा सर्वात मोठा ॲक्‍शनपट असणार असल्याचे बोलले जात आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे तीनच महिने बाकी आहेत. तरीही या चित्रपटाचे नाव, कथा गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. टीझर प्रदर्शित करण्यापूर्वी आम्ही या चित्रपटाचे पोस्टर किंवा नाव घोषित करणार नसल्याचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितले आहे.

चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी आणि प्रमोशनसाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News