नव्या भगव्या जर्सीत कसे दिसतात विराट, धोनी, चहल आणि पांड्या ? पाहा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • भारतीय संघ नव्या भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये
  • ट्विटरद्वारे बीसीसीआयकडून नव्या जर्सीचे अनावरण

बर्मिंगहॅम - सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून ट्विटरद्वारे करण्यात आले होते आणि आता कर्णधार विराट कोहली, धोनी, चहल आणि हार्दिक पांड्या यांचे या जर्सीतील फोटो आयसीसीने शेअर केले आहेत.

 

या नव्या जर्सीत हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लडविरूद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. त्या नियमानुसार भारतीय संघ इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News