मुख्यमंत्र्यांनी G.R काढून मस्करी केली की मदत केली?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019

कोल्हापूर, सांगली, सातारा येथील अनेक गावं पुराच्या पाण्यात अडकेल आहेत. आपले संसार मोडलेले पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत, तसेच अनेक गावांचा संपर्कदेखील तुटला असून बचावाचे कार्य शर्थीने सुरु आहे. यामध्ये सरकारकडून दिलासा व मदत मिळावी हीच अपेक्षा सगळीकडून व्यक्त केली जात असताना शासनाने ७ ऑगस्ट रोजी नवीन जी. आर जाहीर करून पूरग्रस्तांची मस्करकी केल्याचे दिसून येत आहे.

जाहीर केलेल्या G.R नुसार गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या गावात पाणी साचले आहे, त्या गावांनाच फक्त मोफत अन्नधान्य देण्यात येईल, असा मसुदा तयार केला आहे त्यामुळे ज्या गावात पाणी साचलं नुसनही ज्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे, त्या नागरिकांचं काय? असा सवाल सगळीकडून व्यक्त केला जात आहे.

पुरामुळे काही गावांचा संपर्क होऊ शकत नाही, त्या गावांच्या मदतीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून, हा शासनाचा जी. आर पूरग्रस्तांवर  व गावकऱ्यांवर अन्याय कऱणारा आहे, असा रोष सर्व विभागातून व्यक्त केला आहे. 

काही गावांच्या चारही बाजूने पाणी भरले आहे, अशा गावांना  आर्थिकदृष्ट्या व मूलभूत मदत शासनाकडून थेट नाकारण्यात आल्याने त्या गावांचं संगोपन कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे, त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा असाच सल्ला शासनाला दिला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News