नव्या पिढीने जिज्ञासेने विचार, व्यासंग करावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

परभणी - समाजात कष्टाची आणि संपत्तीची वाटणी समान व्हायला पाहिजे, या विचाराने समाजासाठी सम्यक विचारांची मांडणी केली आहे. मानवजातीला फुलविण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना मी समाजासमोर आणले. चार्वाकाने मला दृष्टी दिली. सृष्टीच्या सत्याशी मी एकरुप झालो. आता नव्या पिढीने जिज्ञासेने विचार, व्यासंग करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी येथे केले.

परभणी - समाजात कष्टाची आणि संपत्तीची वाटणी समान व्हायला पाहिजे, या विचाराने समाजासाठी सम्यक विचारांची मांडणी केली आहे. मानवजातीला फुलविण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना मी समाजासमोर आणले. चार्वाकाने मला दृष्टी दिली. सृष्टीच्या सत्याशी मी एकरुप झालो. आता नव्या पिढीने जिज्ञासेने विचार, व्यासंग करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत, पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांनी येथे केले.

येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवारी (ता.सहा) डॉ.आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत महोत्सव व विचार गौरव सोहळा पार पडला. या वेळी ते बोलत होते. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वभंर गावंडे अध्यक्षस्थानी होते. उद्‍घाटक म्हणून कुलगुरु डॉ.`अशोक ढवन यांची उपस्थिती होती. व्यासपिठावर संयोजन समितीचे अध्यक्ष तहसीलदार विद्याचरण कडवकर हे उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव निर्माण करण्यासाठी नव्या पिढीने जिज्ञासेने विचार, व्यासंग करावा. न्यायाच्या दिशेने बदल घडवून आणायचा असेल तर तो घडवून आणावा लागेल. व्यासंग कसा करावा हे सांगताना 
डॉ. साळुंखे यांनी व्हुआन सॉंग या चिनी प्रवाशाने नालंदा विद्यापिठात सातव्या शतकात केलेल्या अभ्यासाचे उदाहरण दिले. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये पर्यायी समाज घडवुन आणावा लागतो. ही व्यवस्था आदर्श व आनंददायी झाली पाहिजे. पाण्याविषयी बोलताना ते म्हणाले, येत्या दहा वर्षात पाण्याची समस्या आणखी गंभीर होणार आहे. पाणी वाचवणे यावर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची समस्या गंभीर आहे. मध्यमवर्गीयांनी शेतकऱ्यांचा शेतमाल माफक दराने खरेदी करत सामाजिकता जपली पाहिजे. आत्महत्या थांबविण्यासाठी मध्यमवर्गीयांनी पुढाकार घ्यावा असेही डॉ. साळुंखे म्हणाले. नव्या समाजनिर्मीतीसाठी भावात्मक, रचनात्मक, क्रियात्मक कार्ये होणे आपेक्षीत असल्याचे सांगुण चांगल्या माणसांचा मेळ बसला पाहिजे, असे डॉ.साळुंके यांनी सांगितले. प्रास्तावीक विद्याचरण कडवकर तर सन्मापत्राचे वाचन नवनाथ जाधव यांनी केले. सुत्रसंचलन सखाराम रणेर यांनी केले. विठ्ठल भुसारे यांनी आभार मानले. सुभाष ढगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. वैष्णवी यादव या विद्यार्थीनीने जिजाऊ वंदना म्हटली. या वेळी चित्रकार शिवराज जगताप यांनी काढलेले चित्र डॉ. साळुंखे यांना भेट देण्यात आले. तसेच सेवानिवृत्तीबद्दल विश्वंभर गावंडे यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News