मौनी रॉयच्या रागाचा नवा किस्सा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

अभिनेत्री मौनी रॉयचे रागावर नियंत्रण राहत नाही आणि मग काय व्हायचे ते होते.

अभिनेत्री मौनी रॉयच्या रागाचे किस्से वारंवार कानावर येत आहेत. तिचे रागावर नियंत्रण राहत नाही आणि मग काय व्हायचे ते होते. मध्यंतरी आकाश अंबानीच्या लग्नात परफॉर्म्सवेळी तिने मोठा हंगामा केला होता.

आता ‘बोले चुडियाँ’च्या सेटवर तिचे चित्रपटाच्या टीमशी बिनसले आणि तिने चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करत होती.

तिने या चित्रपटाला काही तारखा दिल्या होत्या आणि त्याच तारखा तिच्या टीमने अन्य निर्मात्यांना दिल्या. त्यावरून वाद झाले आणि तिला या चित्रपट सोडावे लागले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News