घरटं

श्वेता बरकडे, सातारा
Monday, 8 July 2019

दोघांचे रोज भांडण बघून,
मी आणि माझे मन रोज रडत होते,

सुंदर असे घरटे आमचे 
आज बिखरले गेले होते,
यात चूक नेमकी कोणाची
हेच कळायला मार्ग नव्हते....

दोघांचे रोज भांडण बघून,
मी आणि माझे मन रोज रडत होते,
अचानक मी शांत राहू लागले होते 
कदाचित या वादाचे परिणाम माझ्यावर झाले होते... 

कसं समजावू यांना 
काहीच समजत नव्हते,
आणि सांगायला गेल तरी 
माझे मात्र कोणिच ऐकत नव्हते... 

भांडताना दोघे फक्त  
त्यांचाच विचार करत होते,
पण मला काय वाटत असेल
हे मात्र कोणालाच कळत नव्हते...  

कोर्टात मला प्रश्न विचारण्यात आले
तुला नेमके कोणासोबत रहायचे आहे,
नियतिचा खेल बघा ना आज माझ्यापुढे  
माझ्याच जन्मदात्यांचे पर्याय मांडले होते... 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News