नेहा धुपियाने शेअर केला स्तनपान करतानाचा फोटो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • नेहा इन्स्टाग्रामवर #freedomtofeed ही  मोहीम राबवत
  • आई होणं वाटतं तितकं सोप नाही
  • स्तनपान करणं ही महत्वाची आणि तितकीच सुंदर गोष्ट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी २०१८ नोव्हेंबर महिन्यामध्ये एका चिमुकलीचं आगमन झालं. मेहेरच्या येण्यामुळे नेहाचं आयुष्य पूर्णपणे बदललं असून अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहा तिचे अनुभव शेअर करत असते. सध्या नेहा इन्स्टाग्रामवर #freedomtofeed ही  मोहीम राबवत असून याअंतर्गंत तिने तिच्या मुलीचा स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

त्यासोबतच स्तनपानाविषयी लोकांची जी मानसिकता आहे ती बदलण्याची विनंती केली आहे. नेहा ‘गेल्या आठ महिन्यांपासून आईची भूमिका पार पाडत आहे. आई होणं वाटतं तितकं सोप नाही. अनेक वेळा तिच्या विचारांमुळे रात्री झोप येत नाही. सतत तिचे विचार येत असतात, खरंच आई एक अशी व्यक्ती आहे जिच्या डोक्यात एकाच वेळी अनेक गोष्टींचे विचार सुरु असतात. तिचे विचार एखाद्या ऑटोपायलटसारखे सुरु असतात. बाळाला स्तनपान करत असताना तिचं डोक नीट ठेवलं आहे की नाही, तिचं पोट भरलं आहे की नाही याची सतत काळजी घ्यावी लागते’, असं नेहा म्हणाली.

पुढे ती म्हणते, ‘मला एक गोष्ट समजत नाही की, स्तनपान करणं ही महत्वाची आणि तितकीच सुंदर गोष्ट आहे. मात्र, याविषयी अनेकांनी मतमतांतरे का केली आहेत. मी त्या व्यक्तींचे आभार मानते ज्यांच्यामुळे माझा आई होण्याचा प्रवास सुकर झाला.

या प्रवासात मी एकटी नाही. ब्रेस्टफींडिंग आणि ब्रेस्टपंप याच्याविषयी लोकांची जी मानसिकता आहे, ती बदलण्याची गरज आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण त्यावर उघडपणे बोलायला लागू. मी सगळ्या आईंना सांगू इच्छिते की, त्यांनी त्यांचे अनुभव सांगा. मी माझ्या पेजवरुन त्यांचे अनुभव शेअर करेन’.

दरम्यान, गर्भवती असल्याचं समजल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कोणी काम देणार नाही, या भीतीपोटी नेहाने गरोदर असल्याची माहिती सहा महिन्यांपर्यंत लपवून ठेवली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News