समस्या सोडविण्यासाठी तरुणांची आवश्यकता: डॉ. सवरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019
  • मला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केले आहे.

निवडणुका जवळ आलेल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा भागात राहणाऱ्या नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केले आहे.

डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारादरम्यान आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. त्यासोबतच ते यापुढे म्हणाले की,'डॉ. हेमंत सवरा हे उच्च विद्याविभूषित असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जव्हारमध्येच झाले आहे. त्यांनी वैद्यकीय सेवेची सुरुवातही जव्हारमधूनच केली. त्यामुळे त्यांना इथल्या सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण आहे.

ग्रामीण व दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी उच्चविद्याविभूषित तरुणांची आवश्यकता आहे. आणि डॉ. सवरा यांना उमेदवारी देऊन महायुतीने योग्य निर्णय घेतला असुन त्यांनाच प्रचंड मत देऊन विजयी करा असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यादरम्यान शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद कदम, भाजपाचे राष्ट्रीय परिषद सदस्य देविदास पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल पाटील, रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख दादा मोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, पंचायत समिती सभापती प्रदीप वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News