राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य' यात्रेला आजपासून प्रारंभ !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

६ ते २८ ऑगस्ट यात्रेचा कालावधी

  • २२ जिल्हे 
  • ८० तालुके 
  • ३,००० किलोमीटर यात्रेचा प्रवास

मुंबई : राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरवात होणार असून, शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नरपासून होणार आहे. ‘नव्या स्वराज्याचा नवा लढा’ असे घोषवाक्‍य घेऊन ही यात्रा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणार आहे. 

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार असून, हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

ही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. घोर फसवणूक, युवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी असणार आहे, असे ते म्‍हणाले.

    Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

    Download Samvad App

    Related News