काँग्रेसशी चर्चेसाठी राष्ट्रवादी कडून गटनेत्या सुप्रिया सुळे यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019
  • महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, यावर खासदार सुळे आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची आज प्रदीर्घ चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत काँग्रेस नेतृत्वाशी चर्चेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी, यावर खासदार सुळे आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची आज प्रदीर्घ चर्चा झाली.

सुप्रिया सुळे यांनी आज संसद भवनातील काँग्रेस संसदीय पक्षकार्यालयात राहुल गांधींची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची दुष्काळ, पाणी प्रश्‍न, शेतकरी आत्महत्या या मुद्द्यांवर तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडून भांडवल केल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतील समस्यांबद्दल राहुल गांधींनी खासदार सुळे यांच्याकडून तपशीलवार जाणून घेतले. यासोबत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीवरही दोन्ही नेते बोलले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची एकत्रित दौऱ्यांच्या नियोजनावरही चर्चा झाली. अद्याप यावर निर्णय झाला नसला, तरी लवकरच कृती कार्यक्रमाची आखणी करण्याचेही या बैठकीत ठरल्याचे समजते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News