यूवा चेहरे रिंगणात; पार्थ, अमोल, समीर यांना उमेद्वारी

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ टीम)
Friday, 15 March 2019

मावळ - पार्थ पवार 
शिरूर - अमोल कोल्हे 
नाशिक - समीर भुजबळ 
बीड - बजरंग सोनावणे
दिंडोरी - धनराज महाले

राष्ट्रवादीने आज लोकसभा उमेद्वारांची दुसरी यादी जाहीर केली. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष ज्या यादीकडे लागले होते, ती यादी आज प्रामुख्याने जाहीर करण्यात आली. कारण या यादीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे मावळ मधून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे तरुणांचं नेतृत्व करणारे पार्थ पवार खऱ्या रितीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने आता संपुर्ण तरुणाईचे लक्ष याकडे वळले आहे.

मावळमध्ये गेले काही दिवस या जागेवरून घमासान सुरू होते. या जागेवर शरद पवार निवडणुक लढणार असल्याचे निश्चित होत असताना, अखेरीस शरद पवार यांनी माघार घेत, त्या जागेवर पवार कुटूंबातून राजकारणात आलेल्या तीसऱ्या पिढीला म्हणजेच पार्थ पवारांना उमेद्वारी देणार असल्याचे घोषित केले.

या यादीत पाच लोकसभा मतदार संघाचा समावेश असणार आहे.

मावळ - पार्थ पवार 
शिरूर - अमोल कोल्हे 
नाशिक - समीर भुजबळ 
बीड - बजरंग सोनावणे
दिंडोरी - धनराज महाले

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत काल राष्ट्रवादीच्या 11 उमेदवारांची घोषणा केली. पक्षाचे विद्यमान खासदार व वरिष्ठ नेत्यांना पुन्हा मैदानात उतरवताना मावळ, माढा व शिरूर येथील उमेदवारांची मात्र घोषणा पहिल्या यादीत केली नव्हती. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला असून, उर्वरित उमेदवारांची यादी उद्या आणि उद्या जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली होती. बीड, अहमदनगरच्या उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच ही नावेही जाहीर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या पहिल्या यादीत परभणीतून राजेश विटेकर, तर कल्याणमधून बाबाजी पाटील या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News