रोहित पवारांना झाली बाळासाहेबांची आठवण; मुंबईच्या कॉलजचा किस्सा केला पोस्ट

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Sunday, 17 November 2019

मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली.

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या खास आठवण शेअर केली आहे. 

 

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :
मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक वाटतं आलं आहे. माझ्या मुंबईतल्या काळात स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या या राजकारणाची स्टाईल जवळून पाहता आणि अनुभवता आली.

महाराष्ट्राच्या या भूमीला रत्नांची खाण म्हणलं जातं. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब, स्व.बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्याप्रमाणेच अनेक रत्ने या महाराष्ट्राच्या भूमीने देशाच्या राजकारणाला दिली. मला या सर्वच लोकांच विशेष यासाठी वाटतं कि हे सर्वजण आपल्या निर्णयावर नेहमीच ठाम असत. प्रत्येक निर्णय घेताना लोकांच भलं करणं हाच एकमेव विचार त्यांच्या मनात असे. म्हणूनच राजकारणाचा फायदातोटा न पहाता बाळासाहेबांनी प्रसंगी काँग्रेसला देखील पाठिंबा देवू केला. प्रतिभाताई पाटील, तसेच प्रणब मुखर्जी यांसारखे व्यक्ती राष्ट्रपती व्हावेत म्हणून अगदी खुल्या मनाने पाठिंबा दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा वेळोवेळी सन्मान केला आहे. मा.अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत सत्ता असताना काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त कलादालन उभा करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला होता. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने असणाऱ्या या कला दालनाचे उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी केले होते. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीनिमित्त उभा करण्यात आलेली ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली वास्तू असेल.

 

थेट भूमिका घेणारी अशी माणसं महाराष्ट्राला लाभली हे आपलं भाग्य आहे असे मी समजतो. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News