नीट’चा निकाल जाहीर, यंदा अनेकांची भरारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट’चा निकाल नुकताच जाहीर झाला.

टेंभुर्णी - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा ‘नीट’चा निकाल नुकताच जाहीर झाला. टेंभुर्णी परिसर आणि जाफराबाद तालुक्‍यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. 

आंबेगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक कचरूबा देठे यांचा मुलगा प्रदीप याने ५८८, पिंपळखुटा येथील प्रतीक्षा प्रकाश दुनगहू हिने ५८५, विवेक धनंजय पुराणे याने ५६६, अश्विनी संजय गवते हिने ५४१, सावंगी येथील अजिंक्‍य सुखदेव वरगणे याने ५१०, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप साळोख यांचा मुलगा प्रणवने ४७१, टेंभुर्णी येथील शीतल किशोर गायकवाड हिने ४४३, तर नेहा आपसाहेब साबळे हिने ५११, शुभम अशोक मुंढे याने ४९६, तर नळविहिरा येथील सुदर्शन मुरलीधर वायाळ याने ४९५ गुण मिळवून यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य राखत या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपले आई-वडील, शिक्षकांना दिले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News