नवाजुद्दीन सिद्दीकीचं रॅप साँग; दिसणार रोमॅण्टीक भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019
  • अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नॉनग्लॅमरस भूमिका प्रेक्षकांना अधिक भावतात.
  • आता त्याच्या वाट्याला एक रोमॅण्टीक भूमिका आली आहे.

मुंबई :   अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नॉनग्लॅमरस भूमिका प्रेक्षकांना अधिक भावतात. आता त्याच्या वाट्याला एक रोमॅण्टीक भूमिका आली आहे. ‘बोले चुडियां’ या चित्रपटात तो एका खेडेगावातील बांगडी विक्रेत्याची भूमिका साकारत आहे. गावातील मुलींसाठी चक्क रोमॅण्टीक रॅप गाणं गाताना दिसेल. 

नवाजुद्दीन म्हणतो, ‘मी गायक नसलो तरी रॅप गीत गाण्याचा अनुभव खूप छान होता. या गीताचे बोल देसी अंदाजात आहे आणि यासाठी माझा आवाज योग्य होता. म्हणून चित्रपटाच्या टीमने माझ्याकडून हे करून घेतले.’ चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधील आहे. नवाज स्टाईल हे रॅप साँग कसं असणार, याबाबत उत्सुकता आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News