मास उदगीर तालुकाअध्यक्ष पदी नवनाथ कोकणे तर शहरअध्यक्ष राजेश खंकरे यांची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंन्ट या विद्यार्थी संघटनेची (मास) उदगीर तालुका कार्यकारिणीची निवड.
 

उदगीर: मराठवाडा अससोसिएशन फॉर स्टुडंन्ट या विद्यार्थी संघटनेची (मास) उदगीर तालुका कार्यकारिणी इच्छूक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन निवड करण्यात आली. या मुलाखतीद्वारे तालुकाअध्यक्ष नवनाथ कोकणे तर शहरअध्यक्ष राजेश खंकरे, उदगीर तालुका कार्याध्यक्ष रितेश बिरादार, तालुका उपाध्यक्ष विजय कस्तुरे, वैशिष्ठ बिरादार व शहर उपाध्यक्ष शाम शेळके यांची निवड संघटनेचे स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाचे विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव, विभागीय उपाध्यक्ष अविनाश पाटील, रविकिरण बेलकुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
            
याप्रसंगी विभागीय अध्यक्ष श्रीकांत जाधव म्हणाले, "ही विद्यार्थी संघटना शिक्षण क्षेत्रातील गाढे अभ्यासक व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हासभाऊ उढाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. मराठवाड्यातील शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केजी टू पीजी असा गुणात्मक कौशल्यावर आधारित शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंन्ट ही विद्यार्थी संघटना काम करते, असे प्रतिपादन केले. नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी नवनियुक्त कार्यकारिणीस मार्गदर्शन केले. याप्रसंगी रविकिरण बेलकुंडे, केशव बिरादार, अजय कस्तुरे, आकाश कवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News