निसर्ग सूड उगवतोय कारण...

नूतन सावंत पाटील
Thursday, 8 August 2019

ओडीसा महाराष्ट्र व कर्नाटक पुराने जलमय झाले आहेत... निसर्ग सूड उगवत आहे... निसर्गाचा गळा दाबून त्याला रहस्य व खायला भाग पाडणारे शास्त्रज्ञ हे स्वार्थासाठी मनमानी विध्वंस करणारे धर्म नाही आधुनिक राक्षस आहेत आज निसर्ग सूड उगवत आहे

प्रलय आलाय असे मला वाटते "मोठे संकटच..."माझे गाव, रेठरेहरणाक्ष कृष्णेच्यातीरी. रेठरेहरणाक्ष म्हणजे माझे माहेर गाव. तसेच ते सांगली जिल्ह्यातले...पण आज माझ्या गावाला पुराने वेढले आहे. माझे नातेवाईक व माझे गावकरी पुराच्या पाण्याचा संघर्ष करत आहेत.सुंदर से असे सुंदर अशा नदी किनारी वसलेले गाव आज पुरानी वेढले आहे.संथ वाहते कृष्णामाई असे म्हटले जाते पण आज कृष्ण रौद्ररूप धारण केले आहे व गावात पाणी शिरले आहे. पश्चिम महाराष्ट्राला पुराचा चांगलाच फटका बसला आहे. सगळेच जलमय झाले आहे.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. २००५ साली पण महापूर आला होता...पण आत्ताच्या 2019 चा महापूर अत्यंत प्रचंड प्रमाणात आत्तापर्यंतच्या पुराचे रेकॉर्ड या पुराने तोडले...अकलूज माझे सासर इकडे पाऊस कमी असतो... पण तरीही निरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नदी किनारे ची गावे पाण्याखाली गेली आहेत. नदीकडील लोकांना पुराचा धोका आहे. पहिल्यांदाच अकलाई मंदिर ला पाणी पोहोचले यावरून पुराचे गांभीर्य समजले जाते.

कोयना धरण, वीर धरण, उजनी धरण, अलमट्टी धरण, शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पाण्याच्या विसर्गामुळे पूर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. 28 हजार 397 कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. म्हणजे 132000 लोके स्थलांतरित झाले आहेत.

पुण्याला पण सतर्कतेचा इशारा दिला आहे. शाळेला सुट्टी जाहीर केली आहे... ओडीसा महाराष्ट्र व कर्नाटक पुराने जलमय झाले आहेत... निसर्ग सूड उगवत आहे... निसर्गाचा गळा दाबून त्याला रहस्य व खायला भाग पाडणारे शास्त्रज्ञ हे स्वार्थासाठी मनमानी विध्वंस करणारे धर्म नाही आधुनिक राक्षस आहेत आज निसर्ग सूड उगवत आहे मानव हा निसर्गाचा एक अविभाज्य अंश असल्याने त्याला निसर्गावर आक्रमण करणे असंभव आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे विपरीत परिणाम घडून येत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News