नॅशनल अवॉर्ड जिंकलेल्या 'बधाई हो'चा येणार सिक्वल?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

अभिनेता आयुष्मान खुराणाचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. नुकताच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर लवकरच ‘बधाई हो’ चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराणाचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. नुकताच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर लवकरच ‘बधाई हो’ चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची चर्चा सुरू आहे.

या चित्रपटाचे नाव ‘बधाई हो २’ असे असणार आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पहिल्या भागात आयुष्मानसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, सुरेखा सीकर आणि अभिनेता गजराज राव हे मुख्य भूमिकेत होते. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कोणते कलाकार असणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News