नसीरुद्दीन यांचा ‘हाफ फुल’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • अभिनेता नसीरुद्दीन शहा यांचे हिदी चित्रपट गाजले
  • नसीरुद्दीन आता लघुपटांकडे वळले
  • ‘हाफ फुल’ असे या लघुपटाचे नाव

बॉलीवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अभिनेता नसीरुद्दीन शहा. त्यांचे ‘मोहरा’, ‘सरफरोश’, ‘आक्रोश’सारखे बरेच हिंदी चित्रपट गाजले.

हिंदीबरोबरच ‘द परफेक्‍ट मर्डर’, ‘सच लाँग जर्नी’सारख्या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नसीरुद्दीन आता लघुपटांकडे वळले आहेत. ‘हाफ फुल’ असे या लघुपटाचे नाव आहे.

या लघुपटात नसीरुद्दीन यांच्यासोबत अभिनेता विक्रांत मेसीदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा लघुपट १२ मिनिटांचा असून एका तरुण मुलावर येणाऱ्या संकटांवर आधारित आहे. करण रावल दिग्दर्शित हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच लॉस एन्जेलिस येथील ‘इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये विजयी ठरला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News