'नीट' परिक्षेत नाशिकचा सार्थक राज्यात पहिला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • 695 गुणांसह राष्ट्रीय पातळीवर पटकावला सहावा क्रमांक 
  • बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 91 टक्‍के गुण मिळवले
  • सार्थकचे वडील डॉ. राघवेंद्र भट हे डेस्टिस्ट आहेत
  • आई डॉ. चित्रिका भट या देखील आयुर्वेद विद्या शाखेतून वैद्यकीय सेवेत आहेत

नाशिक: एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रान्स टेस्ट ( नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे. 

सार्थकने यापूर्वी बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून 91 टक्‍के गुण मिळवतांना व्ही. एन. नाईक महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला होता. सार्थकचे वडील डॉ. राघवेंद्र भट हे डेस्टिस्ट आहेत. तर आई डॉ. चित्रिका भट या देखील आयुर्वेद विद्या शाखेतून वैद्यकीय सेवेत आहेत. बायोलॉजी ऑलिम्पियाड स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय बायोलॉजी ऑलिम्पियाड स्पर्धेच्या शिबिरासाठी सार्थकची निवड झाली होती. सध्या सार्थक मुंबई येथील या शिबिरात सहभागी झालेला आहे. सार्थकने एम्समध्ये प्रवेशासाठीदेखील परीक्षा दिली असून या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालय निवडीच्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News