मोदींकडून शिवसेनेसाठी 'हा' मोठा धक्का ; 15 दिवसांत दुसरा मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेला धक्का
  • लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव कुणाला ?
  • उपाध्यक्षपदासाठी शिवसेना आग्रही

नवी दिल्ली: दिल्लीच्या राजकारणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरुपती दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी जगनमोहन रेड्डी यांना लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळावं, यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आग्रही असल्याचं दिसत होतं. 

भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला. लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात ऐतिहासिक यश मिळालं आहे. त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळातही फारसं काही हाती लागलं नाही. त्यानंतर आता शिवसेनेला उपाध्यक्षपदापासूनही दूर राहावं लागण्याची शक्यता आहे.

राज्यातही शिवसेनेला गाजर मिळणार?

राज्याच्या मंत्रिमंडळात काही जागा शिल्लक आहेत. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जात होतं. असं गाजर दाखवून असंतुष्टांना शांत ठेवण्याची ही राजकीय खेळी तर नाही ना अशी चर्चा आहे. मात्र या विस्तारात शिवसेना आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणं प्रतिनिधीत्व मिळेल असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News