घर घर बिजली नंतर आता 'हर घर पाणी' 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल शक्ती मंत्रालय उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जल शक्ती मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी घर घर बिजली नंतर आता हर घर पाणी अशी घोषणा दिली आहे. जल शक्ती मंत्रालय त्यासाठी काम करणार आहे.  

देशात अनेक राज्यात मोठा दुष्काळ आहे. शेतीच नव्हे तर, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सर्वनाच माहिती आहे. पाऊस नसल्याने शेती संकटात आली, पाणी नाही तर शेतकरी काहीच करू शकणार नाही. पाण्याच्या गंभीर समस्येवर केंद्र सरकारने उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.<

>

केंद्रातील आधीच्या जल संधारण आणि पेयजल स्वच्छता मंत्रालय यांना एकत्र करून जल शक्ती मंत्रालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. या मंत्रालया अंतर्गत २०२४ पर्यंत घरा घरात पाणी पोहोचवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. या मंत्रालयाचा कार्यभार राजस्थानचे भाजप खासदार गजेंद्रसहिं शेखावत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News