नराधम बापाने आणि भावाने तीला ढकललं वेशा व्यवसायात, सुरूवात स्वत:पासून केली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

मुंबईला ज्याप्रकारे स्वप्न नगरी मानले जाते, तितकीच घान वृत्तीची दलदल या मुंबईत साचली असल्याचे काहीवेळा निदर्षणास येते.

मुंबईला ज्याप्रकारे स्वप्न नगरी मानले जाते, तितकीच घान वृत्तीची दलदल या मुंबईत साचली असल्याचे काहीवेळा निदर्षणास येते. आपल्या मुलीने वेश्याव्यवसाय कारावा, डान्सबारमध्ये काम कराव आणि पैसा कमवावा म्हणून एका सावत्र बापाने आणि भावाने सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या कुर्ला परिसरात उघड झाला आहे.

मुंबई सेंट्रल येथील अलेक्झांडर सिनेमागृहाजवळ राहणारी एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी गरोदरपणाच्या अवस्थेत कृर्ला स्थानकाजवळ एका सामाजिक संस्थेला सापडली. या संस्थेने ती माहिती कुर्ला रेल्वे स्थानका नजीकच्या नागपाडा पोलीस स्थानकात देताच पोलिसांनी पुढील माहिती काढण्यास सुरूवात केली. 

मुलीची चौकशी केली असता, तिची सावत्र आई मुंबईच्या एका वेश्या कोठ्यावर काम करत असते, आपल्यासोबत तीही यावी अशी त्या सावत्र आईचे म्हणने होते. तसेच तिचे सावत्र वडील आणि भाऊ यांनीदेखील तिचा छळ करण्यास सुरूवात केली. सिगारेटचे चटके देणे, तिच्यावर लैंगिक आत्याचार करणे अशाप्रकारचे छळ त्यांचा केला जात होता.

नागपाडा पोलीस यासंबंधातील पुढील तपास करत आहे, मात्र या मुलीप्रमाणे मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये काहीठिकाणी अल्पवयीन मुलींवर जबरदस्ती केली जात असल्याची माहितीही समोर येत आहे, त्यामुळे हा प्रकार कधी थांबणार हाच सवाल सर्व क्षेत्रातून विचारला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News