कोल्हापूरच्या 'या' दोन आमदारांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

येत्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली.

शिवसेनेकडून कोल्हापूरला मिळणार मंत्रिपद?

 कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर यंदा शिवसेनेने विजय मिळवला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला भरभरुन दिलेल्या कोल्हापूरला शिवसेना काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्या वाट्याला येणारी मंत्रिपद शिवसेनेकडून कोल्हापूरला देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि हातकणंगलेचे आमदार सुजीत मिणचेकर यांची नावं चर्चेत आहेत. या दोघांपैकी एकाचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News