नागपूर विद्यापीठाने ३६ महाविद्यालय केली बंद; या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत

रामेश्वर काकडे
Thursday, 4 July 2019
 • कोणत्याही विद्यार्थ्याने प्रवेश न घेण्याचे केले विद्यापीठ प्रशासनाने आवाहन
 • वर्धा जिल्ह्यातील सात महाविद्यालयांचा समावेश  

वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी सलग्नित असलेल्या ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून रद्द करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १२०' मधील तरतुदीनुसार विद्यापीठाच्या विधानपरिषदेने दहा जून रोजीच्या सभेत घेण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आलेले आहे.
 
बंद करण्यात आलेली महाविद्यालये
नागपूर जिल्हा 

 • कै. रमेश धवड शारीरिक शिक्षण महाविद्यालय, राजीवनगर 
 • एमएटीईएस कॉलेज, अमरावती रोड
 • डॉ.नितीन राऊत महाविद्यालय मोजा पारडी 
 • रंजना हाउसिंग सोसायटी, शिक्षक कॉलनी पांजरा कोराडी 
 • शिंदे महिला अध्यापक महाविद्यालय काटोल
 • इंदिरा गांधी कॉलेज ऑफ एज्युकेशन, बुट्टीबोरी 
 • प्रतिकान कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन फॉर बी. एड  
 • महात्मा फुले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रेशिमबाग चौक 
 • माईड स्पेस इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
 • राणी लक्ष्मीबाई शारीरिक शिक्षण महाविद्यालय सावरगाव 
 • श्रीमती यशोधा भोयर कॉलेज ऑफ एज्युकेशन चाङ्केगडी 
 • सागर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर एज्युकेशन, भिवापूर 
 • सेठ सुभाषबाबू गोवर्धनदासजी पालीवाल अध्यापक महाविद्यालय 
 • विद्यादिप कॉलेज लोहिया ग्राऊंड, कामठी
 • विद्याविहार कॉलेज ऑरेंज प्लाझा काटोल 
 • स्व.नागोरावजी मोवाडे कला महाविद्यालय, नांदागोमुख 
 • गुरुकुल महाविद्यालय भिवापूर 
 • वच्छलाबाई मालकर कॉलेज ऑफ लायब्ररी सायन्स कॉलेज रेड 
 • श्रीज्ञानेश्वर महाराज वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनेगाव 
 • रियल इन्स्टिट्टूय ऑफ प्रोफँशनल स्टडीज नवजीनव कॉलनी
 • गुरुकुल कॉलेज धापेवाडा 

 
भंडारा जिल्हा 

 • वैनगंगा इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज साकोली, 
 • मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ एज्युकेशन,
 • डॉ. अरुण मोटघरे मास्टर ऑफ एज्युकेशन (एम. एड) कोंढा कोसरा, 
 • हरीश मोरे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, 
 • श्रीसाई बी.एड कॉलेज सिव्हिल लाइन, 
 • स्व.पुंडलिकराव तिरपुडे कॉलेज ऑफ एज्युकेशन सावरी,
 • नवयुवक महाविद्यालय संत तुकडोजी वॉर्ड, 
 • श्रीमती नर्मदाबाई ठक्कर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेट बजरंग चौक, महाविद्यालयाचा तर 

गोंदिया जिल्हा 

 • श्रीमती सितादेवी प्यारेलाल अग्रवाल बीएड कॉलेज 
 • देवरी महाविद्यालयाचा समावेश आहे. 
 • वर्धा जिल्ह्यातील सात महाविद्यालयांचा समावेश
 • प्रमोदबाबू शेंडे कला व वाणिज्य महाविद्यालय, सिंदी रेल्वे, ता. सेलू
 • अग्निहोत्री  कॉलेज ऑफ एज्युकेशन बापूजी वाडी
 • स्व. घनश्यामदास भोयर शिक्षण महाविद्यालय, नाचणगाव रोड पुलगाव 
 • चिंतामणी अ‍ॅकेडमीक ऑफ मॅनेजमेन्ट सायन्सेस स्टडी सेलुकाटे 
 • सौ. इंदुमती वानखेडे शिक्षण महाविद्यालय, सेवाग्राम 
 • स्व. नारायणराव वाघ आर्टस अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स कॉलेज, पिपपळखुटा, ता. आर्वी 
 • सुभेदार रामजी आंबेडकर शारिरिक शिक्षण महाविद्यालय, हींगणघाट 

यापुढे या महाविद्यालयांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी कोणताही संबंध नसल्याने या महाविद्यालयामध्ये कोणताही विद्यार्थी कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. जे विद्यार्थी सदर अधिसूचना निर्गमित झाल्यानंतरदेखील वरील महाविद्यालयात प्रवेश घेतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व पालकांची राहील, याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. रमण मदने यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News