मायलेकीचं नातं असाव तर असं; पाहा काय मागितलय महागायिका वैशाली माडेच्या मुलीने आईकडे बर्थडे गिफ्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • मुलीच्या वाढदिसाच्या आठवणीने वैशाली भावुक, अशी केली खंत व्यक्त 
  • आस्थाला आईच्या हातात बीग बॉसची ट्रॉफी पाहायची आहे.  
     

मुंबई :  सध्याच्या घडीला बिग बॉसच्या घरात वैशाली माडेला स्ट्राँग कंटेस्टंट म्हणुन ओळखल जातंय. बिग बॉसमध्ये आघाडीची स्पर्धक म्हणुन महागायिका वैशाली माडेचं नाव पुढे येत असतं. मात्र एका गोष्टीची खंत वैशालीने बिग बॉसच्या घरात व्यक्त केली आहे. ते म्हणजे तिच्या मुलीच्या बर्थडेला तिला जाता येणार नसल्याची. दरवर्षी मुलीचा वाढदिवस थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र मुलीपासुन दुर राहणार आहे.   

19 जुलैला वैशाली माडेच्या मुलीचा म्हणजेच आस्थाचा वाढदिवस आहे. यंदा आपल्याला आस्थासोबत वाढदिवस साजरा करता येणार नसल्याची खंत वैशालीने व्यक्त केली होती. वैशाली म्हणाली, “आस्थाचा वाढदिवस असलेला महिना आता सुरू झाला आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस मी साजरा करते. यंदा ती अकरा वर्षाची होणार आहे. अकरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. असं वाटतंय, ही चिमुकली आताच तर जन्माला आली होती. मी घरात असताना नेहमी माझ्या मागेपुढेच असते. आता यंदा ती कशी साजरा करेल तिचा वाढदिवस ?”

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

जसं आम्ही तुम्हाला बोलेलो की आम्ही तुमच्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेट करू. तो शब्द आम्ही पाळतोय आणि तिच्या बर्थडे ची तैयारी खूप जो़रात चालू आहे. आमचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिचे पण हेच म्हणणं आहे की तुम्ही बिग बॉस सीजन २ जिंकून यावं. आमच्या सर्वांचा पाठिंबा तुमच्यासोबत आहे.Best of luck @vaishalimhade Team Vaishali!

A post shared by Singer Vaishali mhade (@vaishalimhade) on

यावर आस्थाने आई वैशालीसाठी एक मॅसेज दिलेला आहे, “आईने आतापर्यंतचा माझा प्रत्येक वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसावेळी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच वेळ घालवायची. यंदा मात्र मी तिला खूप मिस करेन. पण आई तू माझी काळजी करू नकोस. आजी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे. तू असंच चांगलं खेळत रहा. स्ट्राँग रहा आणि १ सप्टेंबरला मला तुझ्या हातात ट्रॉफी पाहायचीय.” असं आस्थाकडुन सांगण्यात आलय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News