बहरत गेले माझे शब्द

अशोक पवार
Monday, 3 June 2019

खर तर कोण कोणाचे आपण
पण शब्द रुपी धाग्याने बांधत गेलो
निर्मळ झऱ्या सारख 
मी ही मग खळाळत गेलो

सोशल मिडिया च्या
ह्या आभासी जगात
माणुसकी जपणारी माणस

भेटत गेली
लेखणी ही माझी 
त्यांच्याच साठी बहरत गेली

जगण्याला बळ दिल 
निरस वाटणार आयुष्य पुन्हा
बहरत गेलं

खर तर कोण कोणाचे आपण
पण शब्द रुपी धाग्याने बांधत गेलो
निर्मळ झऱ्या सारख 
मी ही मग खळाळत गेलो

जिवंत आहे माणुसकी
माणूसपण अजूनही शाबूत आहे
याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला
माझ्यातला कवी खर सांगतो 
तुमच्या मुळेच जागा झाला

असच अविरत प्रेम करत चला
तुमच्या प्रेमा मूळच
लिहण्यास बळ मिळतंय मला

चुकत ही असेल काही
मी काही शब्दांचा जादूगार नाही
जे दिसत ते सरळ साध्या शब्दात मांडतोय
मी पुरस्कार सोहळे  नावासाठी 
थोडाच लिहतोय,

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News