माझी 'ती'

अक्षय बोराटे 
Monday, 28 January 2019

तसं पाहायला गेलं तर कवी वगैरे नाहीय मी. ना मला कधी यमक जुळवता येतात. पण वाटतं कधी तरी व्हावंस.. कवीनी केलेल्या कवितेच्या शब्दांच्या जादूचा मी चाहता आहे. कसं सुचत असेल त्यांना याचा मला प्रश्न पडतो. 'ती' च्या मुळे? असं म्हणतात प्रेमात जग सुंदर दिसतं, हृदयात गिटार वाजायला लागते वगैरे. या सगळ्याचा परिणाम म्हणून कविता सुचत असेल का? असं असेल तर मला पण माझी 'ती' शोधली पाहिजे. आता विषय निघालाच आहे तर थोडा दूर पर्यंत नेऊयात. मला कवी बनायचंच आहे. हट्ट आहे माझा. मग त्यासाठी कितीही कल्पनेचे मनोरे रचावे लागले तरी चालेल. स्टोरी इंटरेस्टिंग करायला थोडी गंमत करावी लागते. तर कशी हवीय मला माझी 'ती'?

तसं पाहायला गेलं तर कवी वगैरे नाहीय मी. ना मला कधी यमक जुळवता येतात. पण वाटतं कधी तरी व्हावंस.. कवीनी केलेल्या कवितेच्या शब्दांच्या जादूचा मी चाहता आहे. कसं सुचत असेल त्यांना याचा मला प्रश्न पडतो. 'ती' च्या मुळे? असं म्हणतात प्रेमात जग सुंदर दिसतं, हृदयात गिटार वाजायला लागते वगैरे. या सगळ्याचा परिणाम म्हणून कविता सुचत असेल का? असं असेल तर मला पण माझी 'ती' शोधली पाहिजे. आता विषय निघालाच आहे तर थोडा दूर पर्यंत नेऊयात. मला कवी बनायचंच आहे. हट्ट आहे माझा. मग त्यासाठी कितीही कल्पनेचे मनोरे रचावे लागले तरी चालेल. स्टोरी इंटरेस्टिंग करायला थोडी गंमत करावी लागते. तर कशी हवीय मला माझी 'ती'? ऐश्वर्या, दीपिका, आलिया कुणाला इमॅजिन करू कळेनासं झालंय. डोळे बंद करून पाहतो. बघूयात काय दिसतंय का..? इतकी सुंदर नाहीय 'ती', पण आकर्षक आहे. तिच्यापेक्षा खूप सुंदर मुली मी पाहिल्या आहेत. पण माहित नाही का तिच्यावरून माझी नजर हटायच नावच घेत नाहीय. भर उन्हाळ्यात रात्रीची लाईट गेल्यावर किती त्रास होतो. तसं होईल मला 'ती' नाही मिळाली तर..

केस थोडेसे कुरळे आहेत. पण चालेल मला. मीही माझे केस कुरळे करून घेईन. सलून वाला माझा मित्रच आहे. अजून थोडी पुढे कल्पना केली तर 'ती' मला माझ्या आई सोबत बोलताना दिसतेय. सासू आणि सुनेचे जोक्स लोक उगाचंच व्हॉट्सअप वर फॉरवर्ड करतात. इथे तर मला उलट चित्र दिसतंय. (लग्नाचा सीन झालेला आहे, आपल्याकडं सगळं फास्ट फॉरवर्ड असतं). दोघी मिळून माझी खेचतायत. मम्मी मी तुझा मुलगा आहे गं. ही बाहेरून आलेली आहे. सुपर हॅपी फॅमिली. 'सुपर' हे तिच्या येण्याने लागलेलं विशेषण आहे. हॅपी तर आम्ही आधीपासून होतोच. आता थोडंसं अजून दूर गेलोय. 'ती' च्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरुकुत्या दिसतायंत, पण आकर्षकता अजूनही कायम आहे. कदाचित आमच्यातल्या प्रेमाचं टॉनिक काम केलेलं दिसतंय. सदा हसमुख स्वभाव अजूनही तसाच आहे. माझा ही चिडखोर स्वभाव कमी झालाय. आमचे मॉर्निंग & इव्हनिंग वॉक, ते शाब्दिक वाद विवाद. आजही बिलकुल तसंच आहे. काहीच बदललं नाहीय. खूप साऱ्या आठवणी आहेत सोबत. त्या आठवता आठवता आमचा आक्खा दिवस कसं जातो हेही कळत नाही.

डोळे उघडायला हरकत नाही आता. लहानपणी शाळेत असताना प्रार्थना म्हणून झाल्यावर डोळे उघडायचो. तेव्हा कसं प्रसन्न आणि शांत वाटायचं. तसं वाटतंय आता.
खरं तर मला तिचं वर्णन करायचं होतं. पण तिच्यासोबतचा काल्पनिक आयुष्याचा प्रवास इतका सुंदर होता की शारीरिक ठेवणीशी मला काय घेणं देणचं उरलं नाही.
आजकाल दिवसागणिक माझ्या मित्र मैत्रिणींच्या ब्रेकअप च्या गोष्टी कानावर येतात. हे असे ब्रेकअप्स आणि माझा हा स्वप्नातला प्रवास.. किती विरोधाभास आहे ना? म्हणूनच मी सिंगल आहे. माझी 'ती' मला एक ना एक दिवस मिळेलचं. आणि राहिला प्रश्न कवितेचा . 'ती' मिळाल्यावर मी क्लास लावेन. 'ती' मिळणं फर्स्ट प्रायोरिटी आहे आता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News