या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही - भाऊ कदम

YIN BUZZ TEAM
Thursday, 24 January 2019

विनोदी अभिनेते भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. 'श्री कामदेव प्रसन्न' असे या मालिकेचे शीर्षक आहे. त्यांच्यासोबत या मालिकेत प्रमुख भूमिकांत सागर करंडे आणि भाग्यश्री मोटे हे कलाकार असतील. 

विनोदी अभिनेते भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. 'श्री कामदेव प्रसन्न' असे या मालिकेचे शीर्षक आहे. त्यांच्यासोबत या मालिकेत प्रमुख भूमिकांत सागर करंडे आणि भाग्यश्री मोटे हे कलाकार असतील. 

भाऊ कदम म्हणाले, “हंगामा प्लेच्या श्री कामदेव प्रसन्न या नवीन मराठी मालिकेसाठी मी शूटिंग सुरू केले आहे. या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही! या मालिकेमध्ये मी आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे. हंगामा प्लेसोबत एका डिजिटल मालिकेत काम करायला मिळत आहे याबद्दल मला आनंद वाटत आहे.'

सागर यामध्ये एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे आणि भाग्यश्रीची व्यक्तिरेखा गुप्तपणे त्याच्यावर प्रेम करणा-या मुलीची आहे. या मालिकेत आशा शेलार व विनय येडेकरही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.

सागर कारंडे म्हणाला, “मी या मालिकेत एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे. या माणसाच्या आयुष्यात काही अनोख्या परिस्थिती येतात आणि त्या त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेने दिलेली मदत स्वीकारावीच लागते आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी गोंधळ होतो. त्यातून काही विनोदी क्षण निर्माण होतात. मला आणि अन्य सर्व कलाकारांना आमच्या अनोख्या अवतारांमध्ये या मालिकेत पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असेल, अशी खात्री मला वाटते.”

भाग्यश्री मोटे म्हणाली, “आत्तापर्यंत कधीही सांगितल्या गेल्या नाहीत अशा कथा सांगण्यासाठी हंगामा प्लेसारखी व्यासपीठे पुढाकार घेत आहेत ही खूप सुखद बाब आहे. या मालिकेत मी ज्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे ती सागरच्या व्यक्तिरेखेवर गुपचूप प्रेम करते. या मालिकेत घडणा-या सर्व गमतीशीर घटनांमागील गुपित काय हे तिला ठाऊक नाही. एक वेगळी व उत्तम लिहिलेली विनोदी कथा असल्याने ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडेल, अशी खात्री मला वाटते.”

या मालिकेचे दिग्दर्शक संदीप मनोहर नवरे म्हणाले, “श्री कामदेव प्रसन्न ही मालिका एका रोचक संकल्पनेवर आधारित आहे. असे प्रतिभावंत कलाकार घेऊन अशी कथा आजपर्यंत कोणी सांगितलेली नाही. ही मालिका तयार करताना आम्ही जेवढा आनंद लुटत आहोत तेवढाच आनंद ती बघताना प्रेक्षकांना मिळणार आहे हे नक्की.”

हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफेमराठी यांची निर्मिती असलेली श्री कामदेव प्रसन्न ही मालिका हंगामा प्लेवर लवकरच सादर केली जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News