'फ्रेंडशिप डे" बद्द्ल माझं वैयक्तिक मत

सत्यम रामचंद्र वानखडे
Monday, 5 August 2019
  • राजीव दीक्षित यांनी Friendship day चा इतिहास सांगितला आहे..तो आणि आपल्या देशातील मैत्रीच्या नात्याबद्दलची पार्श्वभूमी काय, संस्कृती ,मैत्रीबद्दलची ऐतिहासिक उदाहरणे, माहीत असलेच पाहिजे आणि पाश्चात्य देशांत हा Friendship day बद्द्ल काय वैचारिक पाया ,इतिहास का सुरु झाला हे पण माहिती असायलाच हवं..

राजीव दीक्षित यांनी Friendship day चा इतिहास सांगितला आहे..तो आणि आपल्या देशातील मैत्रीच्या नात्याबद्दलची पार्श्वभूमी काय, संस्कृती ,मैत्रीबद्दलची ऐतिहासिक उदाहरणे, माहीत असलेच पाहिजे आणि पाश्चात्य देशांत हा Friendship day बद्द्ल काय वैचारिक पाया ,इतिहास का सुरु झाला हे पण माहिती असायलाच हवं..

तिकडचे घाणेरडे concepts, मित्रांमध्ये सब चालतं, फालतूपणा इकडे येऊ नये याची काळजी घ्यावी..पण तिकडल्या सकारात्मक गोष्टींचा जरूर स्वीकार करावा. बाकी या दिवशी मुलींची छेडछाड, दारू हुक्का व्यसने, हुल्लडबाजी, Friendship च्या नावाखाली पैशांची नाहक नासधूस, नको नको ते प्रकार नको.
मैत्रीमध्ये हवी आपुलकी, जिव्हाळा,आणि चुकल्यास वज्राहून कठोर पण  आनंदात फुलहून कोमल ..सुख दुःख यांत समरसता, कधीही साथ..

बस्स अशा निखळ पध्दतीने पवित्र मैत्रिदिन साजरा केल्यावर कोणी विरोध करत आहे तर तो डोक्यावर पडला अस समजावं.. ते हाताला चिंध्या बांधायची काय पण गरज नाही. मनातून प्रेम हवं. या दिवशी तुम्ही समाजात ज्यांना कोणी नाही अशा लोकांना जर आधार देत असाल ,गरीब, अनाथ, वृद्ध, अपंग, तर तुम्हि खऱ्या अर्थाने मैत्रिदिन साजरा करू शकता..
सुदामा श्रीकृष्ण, अश्फाक उल्ला खान व रामप्रसाद बिस्मिल, अनेक क्रांतिकारक समाजसुधारक , मोठ्या व्यक्ती वैचारिक शत्रू असून देखील मित्र होते.

आजकाल संघटना फंगटना यामुळं पण नात्यावर परिणाम होऊ नये..दिवसाच्या निमित्ताने शुभ कर्म ,चांगल्या उद्देशाने साजरा केल्यास आणि संस्कृती जपल्यास कोणी का विरोध करेल या Day चा?? आणि मैत्रीचा दिवस नसतो शेवटी हेच खरं.. वसुदैवह कुटुंबकम , सर्वसाठी समान प्रेम असावं.. चांगले मित्र ची संगती धरली तोच उत्तम सत्संग समजावा..अगदी टोकाची भूमिका न घेता Balence राखणे उत्तम.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News