माझी मैत्री असावी मोगऱ्यासारखी आणि...

पूनम माने, फलटण
Sunday, 4 August 2019

तुझी आणि माझी मैत्री
असावी.. मोगऱ्यासारखी
दुरवर गेलो तरी
अस्तित्वाची जाणीव करून देणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. दोन डोळ्यांसारखी
सोबत हसणारी, सोबत रडणारी
कधीही एकमेकांची साथ न सोडणारी..

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. थंडगार पावसासारखी
आठवणींच्या डोहात बुडाल्यावर
 भिजवुनी ओलेचिंब करणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. निर्मळ पाण्यासारखी
 स्वच्छंदी तरंग दिसले तरी
 कधीही रंग न बदलणारी...

तुझी आणि माझी मैत्री
असावी.. मोगऱ्यासारखी
दुरवर गेलो तरी
अस्तित्वाची जाणीव करून देणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. दोन डोळ्यांसारखी
सोबत हसणारी, सोबत रडणारी
कधीही एकमेकांची साथ न सोडणारी..

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. थंडगार पावसासारखी
आठवणींच्या डोहात बुडाल्यावर
 भिजवुनी ओलेचिंब करणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. निर्मळ पाण्यासारखी
 स्वच्छंदी तरंग दिसले तरी
 कधीही रंग न बदलणारी...

तुझी आणि माझी मैत्री
असावी.. शितल चंद्रासारखी
 अंधाऱ्या काळोखातही
एकमेव आधार वाटणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
 असावी.. कोवळ्या प्रकाशासारखी
 नकळत दुरवर जाऊन
 क्षितिजाला गाठणारी...

तुझी आणि माझी मैत्री
 असावी.. अथांग सागरासारख
किनाऱ्याला जपुन
 सतत वाहत राहणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
असावी.. अतुट रेशमी बंधासारखी
 कधीही विसरू न देता
 आठवणीत जपुन ठेवणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
 असावी.. कवितांसारखी
 मनाला उमगताच
 हातून उलगडणारी...

 तुझी आणि माझी मैत्री
 असावी.. गोड साखरेसारखी
रुसलो, रागवलो तरी
कायम गोडवा जपणारी...

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News