माझी क्लासमेट

सचिन शिंदे
Tuesday, 6 August 2019

भुरभुरणारे तीचे केस,
गालावर पङणारी खटयाळं खळी...
मला पाहुन ती पण हसली...
जुन्या सवयी प्रमाणे,

काल खुप वर्षानी बस मध्ये,
मला माझी क्लासमेट दिसली...
तशीच होती तिची मोहक अदा,
कधी काळी ज्यांच्या वर असायचो आम्ही फिदा....
भुरभुरणारे तीचे केस,
गालावर पङणारी खटयाळं खळी...
मला पाहुन ती पण हसली...
जुन्या सवयी प्रमाणे,
शेजारच्या सिट वर माझी बॅग मी हळुच सरकवली...
ती पण येऊन माझ्या शेजारी.थांबली...
माझ्या पण ह्रदयाची गती वाढली...
तब्बल पंधरा वर्षांनी,
तिच्या मनातलं गुपित तिनं खोलंल...
तिच्या मुला कङ बघतं ती त्याला बोलली...
बाळा इथं तुझ्या "मामा " शेजारी बसं, 
त्याला बिलकुल त्रास देऊ नकोस...
गालावरची खटयाळं खळी परत एकदा,
खुप काही सांगुन गेली...
माझी क्लासमेन्ट मागच्या सीटवर,
सगळा पालापाचोळा झटकून,निवांत जाऊन बसली...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News