एमआयटी आयसीटीमध्ये सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
  • संस्थेला एमएचआरडीकडून शायनिंग नोडल सेंटर म्हणून नुकतीच मान्यता मिळाली आहे.
  • करारावर एमआयटीचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले आणि आयसीटी डीन प्रा. रेखा सिंघल यांनी स्वाक्षरी केली.

औरंगाबाद: महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) औरंगाबाद आणि इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी (आयसीटी) मुंबई यांच्यात शैक्षणिक सहकार्य व देवाणघेवाण करण्यासाठी सामंजस्य करार नुकताच झाला आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना विकासात्मक उपक्रमातून संयुक्त संशोधनाला व नव्या संधीना चालना मिळणार आहे. 

एमआयटी ही नॅक ए ग्रेड मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संस्था आहे. संस्थेला एमएचआरडीकडून शायनिंग नोडल सेंटर म्हणून नुकतीच मान्यता मिळाली आहे. तर, आयसीटी हे अभिमत विद्यापीठ आहे. रसायन तंत्रज्ञान क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. दोन्ही संस्थेत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. करारावर एमआयटीचे प्राचार्य डॉ. संतोष भोसले आणि आयसीटी डीन प्रा. रेखा सिंघल यांनी स्वाक्षरी केली. 

आयसीटी जालनाच्या संचालक प्रा. स्मिता लेले उपस्थित होत्या. डॉ. के. के. गंगाखेडकर, उपप्राचार्य, विभागप्रमुख यांनी उपस्थित राहून याविषयी विस्तृत चर्चा केली. करारामध्ये इंटरडिसेप्लेनरी प्रोजेक्‍ट यात प्लॅस्टिक ऍण्ड पॉलिमर टेक्‍नॉलॉजी, फुड टेक्‍नॉलॉजी, कृत्रिम बुध्दिमत्ता, कंपोझीट टेक्‍नॉलॉजी, नॅनो टेक्‍नॉलॉजी, बायोडिग्रेडेबल प्लॅस्टीक, बिग डेटा, कॉम्युटेशनल फ्लुईड डायनॅमिक्‍स, एनर्जी, डेटीव्ह मॅनिफॅक्‍चरिंग यावर करार झाला. 

करारानुसार दोन्ही संस्था आपापल्या विद्यशाखा, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण करण्यास सक्षम आहे, तसेच एम.टेक. व पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे मार्गदर्शन, सेमिनार, परिषदे, शैक्षणिक जत्रा, प्राध्यापक विकास कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम हे करु शकतील. प्राध्यापक व विद्यार्थी ह्या सुविधांचा लाभ आयसीटी (मुंबई, जालना व भुवनेश्वर) व एम.आय.टी. परिसराच्या सामंजस्य उपयोग करु शकतील. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News