मंडळी, आपल्या धन्याचा राज्याभिषेक हाय; यताय नव्ह? यायलाच पाहिजे!

सायली कदम, यिनबझ
Wednesday, 12 June 2019

देव, देश आणि धर्मा पायी प्राण घेतला हाती.
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती!!

अशाच सरदारांच्या साक्षीने स्वराज्य उभारणाऱ्या महाराजांच्या तिथीवत राज्याभिषेकाचा असा असेल रम्य सोहळा...

ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा उभा राहतो, ज्यांच्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळते, फक्त महाराज म्हटल्यानंतर अंगातल्या ज्योतीचा वनवा होतो, अशा नामस्मरणाचे, जयघोषाचे आणि रणधुरंदर व्यक्तीमत्वाचे हकदार म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराज... 

छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली आणि राजपुरोहित गागाभट्ट यांच्या हस्ते, 'जेष्ठ शुद्ध त्रयोदशी' या शुभमुहूर्तावर राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यात आला. तेव्हापासून स्वराज्याची राजधानी म्हणून श्रीमंत रायगडास घोषित केले. त्या दिवसानंतर दरवर्षी परंपरे नुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षीसुध्दा शिव राज्याभिषेक सेवा समिती (दुर्गराज रायगड), कोकण कडा मित्र मंडळ (रायगड), रायगड जिल्हा परिषद यांनी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे जेष्ठ-शुध्द त्रयोदशीला आयोजित केला आहे. तसेच या समारंभात लाखोंच्या संख्येने शिवभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहनसुध्दा केले आहे.

कसं असेल, श्रीमंत रायगडावर कार्यक्रमाचं नियोजन...
जेष्ठ शुद्ध द्वादशी, १४ जून

 • राज्याभिषेकाची सुरूवात जेष्ठ शुद्ध द्वादशी, म्हणजेच १४ जून २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता शिकाई देवीच्या मंदिरातील पूजनाने होणार आहे. 
 • सकाळी १०.०० वाजता व्याखाणाने आयोजन करण्यात आले आहे.
 • दुपारी १२.०० वाजता निमंत्रित जोडप्यांच्या हस्ते जगदीश्वराचा अभिषेक होईल.
 • सायंकाळी ६.०० वाजता निमंत्रित संस्था व व्यक्तीनच्या हस्ते शिवतुलादान करण्यात येईल. 
 • सायंकाळी ७.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
 • रात्री ९.०० वाजता उपस्थित मंडळींसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 • रात्री ९.३० वाजता पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करण्यात येईल.

जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, १५ जून

 • दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेष्ठ शुद्ध त्रयोदशी दिनांक १५ जून, २०१९ रोजी पहाटे ४.०० वाजता पालखीची सजावट करण्यास सुरूवात होईल.
 • सकाळी ५.०० वाजता पालखीची पूजा करण्यात येईल.
 • सकाळी ५.४५ वाजता पालखीचे प्रस्थान होईल.
 • सकाळी ६.०० वाजता नगरखान्यासमोर भव्य ध्वजरोहण होईल.
 • सकाळी ७.१५ वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रारंभ होईल. 
 • सकाळी ८.०० वाजता शाही शोभयात्रेची सुरूवात होईल. 
 • दुपारी २.३० वाजता किल्ले स्वछता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
 • अशाप्रकारे श्रीमंत रायगडाच्या साक्षीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाठात संपन्न होईल.

तर मग मंडळी, येताय न्हवं; आपल्या राज्याच्या अभिषेकाला... 
या तर मग, छत्रपती शिवाजी राजेंच्या चरणी नतमस्तक होऊया.

ह्योबी जल्लोष एकदा बघाच...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News