मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय; बकरी ईदला कुर्बानी न देता, पूरग्रस्तांची मदत करणार

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 12 August 2019

पूरग्रस्त कुटुंबीयांची मदत करत मुस्लीम बांधवांनी माणूसकी धर्माचे पालन करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. दरम्यान, राज्यभरात ठिकठिकाणी सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत गोळा केली जात आहे

मुंबई- कोल्हापूर-सांगलीतील महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे या भागातील बकरी ईद आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांवर पावसाचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदला बकरीची कुर्बानी न देता त्या पैशातून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही मुस्लीम बांधव बकरी ईदच्या दिवशीच्या खर्चात कपात करुन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.

पूरग्रस्त कुटुंबीयांची मदत करत मुस्लीम बांधवांनी माणूसकी धर्माचे पालन करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे. याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. दरम्यान, राज्यभरात ठिकठिकाणी सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत गोळा केली जात आहे. शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था, कारखाने आणि इतर ठिकाणी देखील मदत गोळा केली जात आहे. गावागावातून धान्य आणि खाद्यपदार्थ जमा करुन पूरग्रस्त भागात पाठवले जात आहेत.

देशभरात सोमवारी बकरी ईद सण साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खरेदीची धामधूम सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रात महापुराने थैमान घातल्याने मुस्लीम बांधवांकडून संवेदनशीलतेचे दर्शन घडले. मुस्लीम धर्मात ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते, यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News