आरएसएसशी संबंधीत संघटना मुस्लिम आणि दलित विरोधी : असदुद्दीन ओवेसी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • दलित आणि मुस्लिमांनाच केले जात आहे लक्ष्य
  • जय श्रीराम आणि वंदे मातरम म्हटले नाही, तर केली जाते मारहाण

हैदराबाद ः जय श्रीराम आणि वंदे मातरम म्हटले नाही, तर लोकांना मारहाण केली जाते. केवळ दलित आणि मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. या घटनांमागे ज्या संघटना आहेत, त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज केला.

काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून ओवेसी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला होता. मुस्लिम हे दहशतवादी, राष्ट्रविरोधी किंवा गोहत्या करणारे आहेत, याच मानसिकतेतून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसे वातावरण भाजप आणि आरएसएसने निर्माण केले आहे, असा आरोप त्यांनी केला होता. आता त्यांनी वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा न म्हणणाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरून हल्लाबोल केला आहे.
 
जय श्रीराम आणि वंदे मातरम म्हटले नाही, तर मारहाण केली जाते. अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटनांचेे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. मुस्लिम आणि दलितांनाच लक्ष्य केले जात आहे. यामागे असलेल्या संघटनांचा आरएसएसशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News