'ठाकरे' चित्रपटाचे संगीत लॉन्च

यिनबझ टीम
Thursday, 24 January 2019

यिनबझ टीम  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचे संगीत लॉन्च करण्यात आले असून, 'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आयुष्य या सगळ्यांवर या चित्रपटात भाष्य केले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचे हिंदी व मराठी ट्रेलर नुकतेच वडाळा येथील आयमॅक्‍स या मल्टिप्लेक्‍समध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

यिनबझ टीम  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' चित्रपटाचे संगीत लॉन्च करण्यात आले असून, 'आया रे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आयुष्य या सगळ्यांवर या चित्रपटात भाष्य केले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या 'ठाकरे' या चित्रपटाचे हिंदी व मराठी ट्रेलर नुकतेच वडाळा येथील आयमॅक्‍स या मल्टिप्लेक्‍समध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाचे निर्माते संजय राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव, 'वायकॉम 18'चे अजित अंधारे, निखिल साने व अन्य उपस्थित होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही संवाद आणि दृश्‍यांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याचे बोलले जात होते.

निर्माता : व्हायकॉम 18 मोशन पिक्‍चर्स, राऊटर्स एन्टरटेंन्मेंट
दिग्दर्शक : अभिजित पानसे
कलाकार : नवाजुद्दीन सिद्दीकी, अब्दुल कादर अमीन, लक्ष्मण सिंग राजपूत, अनुष्का जाधव, निरंजन जवीर 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News